बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांनी त्यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध पदांची यादी:

  1. वैद्यकीय संक्रमण सल्लागार

  2. कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्तदोष- कर्करोग

  3. अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्णवेळ)

  4. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

  5. मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ

  6. मानद बीएमटी फिजिशीयन

  7. मानद त्वचारोग तज्ञ

  8. मानद हृदयरोग तज्ञ

  9. श्रवणतज्ञ (अर्ध वेळ)

  10. परिचारीका

  11. कनिष्ठ औषध निर्माता

  12. स्वागतकक्ष कर्मचारी

  13. डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेची माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून तपासणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ एप्रिल २०२५

महत्त्वाच्या सूचना:

  • उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक समजून घ्याव्यात.

  • अपूर्ण किंवा अप्रमाणित माहिती असलेले अर्ज अमान्य केले जातील.

अधिक माहिती आणि जाहिरात:

  • अधिक तपशीलांसाठी आणि मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी, कृपया BMC अधिकृत वेबसाइट भेट द्या.

उमेदवारांनी वेळेवर अर्ज सादर करून ही सुवर्णसंधी साधावी!

अधिकृत वेबसाईट