पुणे महानगरपालिका भरती २०२५ – कनिष्ठ अभियंता पदांसाठी सुवर्णसंधी

पुणे महानगरपालिका (PMC), पुणे येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण १६९ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आणि पदविका धारकांसाठी एक उत्तम संधी आहे.


उपलब्ध पदे

  • कनिष्ठ स्थापत्य अभियंता (वर्ग-३) – एकूण १६९ जागा


शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • (सविस्तर पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.)


वयोमर्यादा

  • साधारण प्रवर्ग: किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे

  • मागासवर्गीय / अनाथ / खेळाडू प्रवर्ग: ५ वर्षे सवलत

  • दिव्यांग / दिव्यांग माजी सैनिक / भूकंपग्रस्त / प्रकल्पग्रस्त / स्वतंत्र सैनिकाचा पाल्य प्रवर्ग: ७ वर्षे सवलत

  • अंशकालीन प्रवर्ग: ५५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा


परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹१०००/-

  • मागास प्रवर्ग: ₹९००/-


अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • ऑनलाईन अर्ज ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करणे आवश्यक आहे.


महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

  • पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा व इतर सर्व अटींसाठी अधिकृत जाहिरातीचा अभ्यास करणे बंधनकारक आहे.

👉 मूळ जाहिरात वाचा  अधिकृत वेबसाईट


📌पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी विलंब न लावता अर्ज करावा.